न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२३) :- जगदगुरु संत तुकाराम महाराज मंदिरात प्रत्यक्षात अतिरेकी घुसले आणि त्यांनी काही वारकरी व भाविक यांना बंधक केले. तर, वारकरी व भाविक यांची सुखरूप सुटका करुन अतिरेक्यांवर कशा पद्धतीने कारवाई करता येईल? याचा प्रत्यक्षात सराव (दि. ११) रोजी सायंकाळी ५.३० ते ७ या दरम्यान देहुतील मुख्य मंदिराच्या आवारात पोलिसांनी केला.
या कारवाई दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, अमरनाथ वाघमोडे तळवडे वाहतुक विभाग, सत्यवान माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, दिगंबर सूर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देहुरोड पोलीस स्टेशन, वनिता धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरगाव पालीस स्टेशन, सहा पोलीस निरीक्षक राऊत, दहशतवाद विरोधी पथकासह ६ पोलीस स्टेशनचे १० सहा पोलीस निरीक्षक/ पोलीस उप-निरीक्षक, ३० अंमलदार, पोलीस मुख्यालयाकडील ०२ आर.सी.पी ०५ क्यूआरटी पथक पुणे ग्रामीण बीडीडीएस पथक, वैदयकीय उपचार पथक, फायर ब्रिगेड वाहन यांनी सहभाग नोंदवला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे, सह पालीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त परदेशी, पोलीस उप-आयुक्त याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.















