न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ करण्यासाठी मनापासून सेवा करणाऱ्या सफाई सेवक महिलांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन दिघी येथील संतोष वाळके यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा, दिघीच्या वतीने ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिघी येथे झेंडा वंदन करण्यात आले. दिघीमधील आरोग्य विभागाच्या सफाई सेवक महिला सुषमा जाधव, सत्यभामा उपाडे, रुक्मिणी खरात, लक्ष्मी घोडेकर, अनिता डोळस, सुगंधा भालचिम, मीरा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख मनोज परांडे, कैलास विठ्ठल तापकीर, पिंपरी चिंचवड मनपा शाळेतील क्रीडाशिक्षक हरिभाऊ साबळे, डॉ. अविनाश वाळुंज, पुनाजी आंबवणे, मंगेश देशमुख, विलास साबळे, प्रदीप घुटे तसेच सामाजिक कार्यकर्ते तुकाराम महाजन, आनंदराव सूर्यवंशी, अभिजीत जाधव, सुनील गंभीर, राजकुमार बांगर, महेश बांगर, दत्तात्रय बांगर, सुखदेव तांदळवाडी, संजय हरिभाऊ वाळके आदींसह दिघी परिसरातील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.














