- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विश्वकर्मा योजनेला मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली(दि. १६ ऑगस्ट २०२३) :- मोदींच्या घोषणेनंतर केवळ २४ तासांच्या आत केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना अंमलात आणण्याची घोषणा केली. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विश्वकर्मा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या विश्वकर्मा योजनेच्या घोषणेनंतर केंद्रीय मंत्रमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. मोदींच्या घोषणेनंतर केवळ २४ तासांच्या आत केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना अंमलात आणण्याची घोषणा केली. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विश्वकर्मा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी ही योजना सुरू केली जाणार आहे.
मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात म्हटले की,पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांसाठी पुढील महिन्यात १३,००० ते १५,००० कोटी रुपयांच्या प्रारंभिक खर्चासह विश्वकर्मा योजना सुरूकेली जाईल. २०२३ च्या अर्थसंकल्पात’विश्वकर्मा योजना’जाहीर करण्यात आली होती.
सुरुवातीला ही योजना १५,००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सुरू केली जाईल आणि नंतर ती वाढवली जाईल. सोनार, गवंडी, नाई, लोहार यासारख्या काम करणाऱ्या लोकांना मदत करणे हा केंद्राच्या या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा उद्देश या वर्गाला प्रशिक्षण आणि साधने उपलब्ध करून देणे हा असणार आहे.
सप्टेंबरमध्ये विश्वकर्मा जयंतीला ही योजना सुरू होणार आहे. १७ सप्टेंबर २०२३ रोजी विश्वकर्मा जयंती आहे. विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेद्वारे कुशल कारागिरांना आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेद्वारे तरुणांना प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, ब्रँड प्रमोशन, स्थानिक आणि जागतिक बाजारपेठांशी जोडणे, डिजिटल पेमेंट आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात विश्वकर्मा योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे व्यवसायासाठी कर्ज घेणे, कौशल्य विकसित करणे आणि तंत्र, डिजिटल सक्षमीकरण, कच्चा माल आणि विपणन क्षेत्रात मदत करणे यासाठी मदत होणार आहे.


















