- महिला जखमी; दोघेजण पोलिसांच्या ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- किराणा सामान खरेदी करण्यासाठी फिर्यादी जात होते. दरम्यान दोघा आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन संगणमताने फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी घरी जात असताना आरोपीने चाकु घेवुन तसेच सहआरोपीने कोयता घेवुन परिसरात दहशत माजवली.
फिर्यादीच्या घरामध्ये घुसुन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीच्या पत्नीवर मुख्य आरोपीने चाकुने वार केल्याने त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. १५) रोजी १०.०० च्या सुमारास इंदिरानगर झोपडपटटी, डबल ट्री हॉटेलच्या पाठीमागे, चिंचवड येथे घडला.
फिर्यादी तुकाराम चंदु पवार यांनी आरोपी रोहित चांदणे, शुभम चांदणे या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ८५५ / २०२३ भा.दं.वि कलम ४५२,३२४, ३२३, ३४, आर्म अॅक्ट ४,२५, महा.पो.अधि. कलम ३७ (१) ( ३ ) सह १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ नुसार गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. सपोनि शेटे पुढील तपास करीत आहेत.

















