न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- दरोडा, जबरी चोरी व घरफोडी करणारा १४१२ के. आर. टोळीच्या प्रमुखासह त्याच्या साथिदाराला दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ दरोडा व ५ घरफोडीचे गुन्हे उघड करून १८७ ग्रॅम सोने, ०१ गावठी पिस्तुल तसेच ०२ जिवंत काडतूस व कार असा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेकडील दरोडा विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अधिकारी व अमलदार हे दरोडा, जबरी चोरी व घरफोडी चोरी करणाऱ्या इसमांची गोपनीय बातमी प्राप्त करीत होते. तेव्हा दिवंगत पोलीस नाईक १४९१ राजेश कौशल्ये यांना त्यांचे बातमीदारांकडुन माहिती प्राप्त झाली की, ०५ घरफोडी व ०१ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जबरी चोरीच्या गुन्हयामध्ये पाहिजे असलेला भोसरी दिघी परिसरातील १४१२ के. आर. टोळीचा म्होरक्या किरण गुरुनाथ राठोड याने मागिल आठ ते दहा महिन्यांमध्ये अनेक चोऱ्या केल्या असुन तो त्याची ओळख लपवुन भोसरी दिघी परिसरातच वावरत असतो, अशी पोलिसांना माहिती मिळाली.
तांत्रिक विश्लेषनातुन पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी (दि.०१) आरोपी किरण गुरुनाथ राठोड (वय २६ वर्षे, रा रोडे हॉस्पीटल शेजारी, दिघी), आणि त्याचा साथिदार अर्जुन कल्लप्पा सुर्यवंशी (वय १९ वर्षे रा नवीन बाजार मैदान जवळ, कोरेगाव मिमा, पुणे), संतोश जयहिंद गुप्ता (वय १८ वर्षे, रा खंडोबा माळ, भोसरी), यांच्यासह लाल रंगाच्या फोर्ड फिगो या कारमधुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या कसून तपासावरुन त्यांनी दिघी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं ५४२/२०२२ भा.द.वि.क. ४५४,४५७.३८० हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने दरोडा विरोधी पथकाकडुन त्यांना सदर गुन्हयामध्ये अटक करुन पुढील तपास सुरु केला.
आरोपीकडे पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या तपासात त्यांनी त्यांचा एका वि.सं.बालक साथिदारासह घरफोडीचे ०५ गुन्हे केल्याचे तसेच आरोपी किरण राठोड व अर्जुन सुर्यवंशी यांनी त्यांच्या अन्य साथिदारासह दरोडयाचा ०१ गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान आरोपींकडुन १८७ ग्रॅम सोन्याचे दागिने, किरण राठोड हा गुन्हा करतेवेळी जवळ बाळगत असलेले ०१ लोखंडी पिस्टल व ०२ जिवंत काडतुस, गुन्हा करतेवेळी वापरलेली फोर्ड फिगो कार असा एकुण १२,११,००० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपींकडुन चोरीचा मुद्देमाल विकत घेणारे कोरेगाव भिमा येथिल ०२ सोनार व्यवसायीक व परभणी येथिल ०१ सोनार व्यवसायीक यांना आरोपी करण्यात आलेले आहे. तसेच सोने विक्री करण्यास मदत करणाऱ्या एका व्यक्तिस देखील आरोपी करण्यात आलेले आहे. आरोपींकडुन सहा गुन्हे उघडकीस आले आहे.
निगडी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नंबर २३/२०२३ भा.द.वि.क. ४५७,३८० प्रमाणे, सांगवी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नंबर ३६२ / २०२३ भा.द.वि.क. ४५७,३८०,३४ प्रमाणे, भोसरी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नंबर ६४१/२०२३ भा.द.वि.क. ४५७,४५४,३८० प्रमाणे, दिघी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नं ५४२ / २०२२ भा.द.वि.क. ४५४.४५७,३८० प्रमाणे, आळंदी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नंबर २०३ / २०२३ भा.द.वि.क. ४५७,३८० प्रमाणे, चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिनं १८६६ / २०२२ भा.द.वि.क. ३९५,३६५,३४१,३२३,५०६ मा.ह.का. क. ४ (२५) प्रमाणे आरोपींवर गुन्हे दाखल आहे.
आरोपी किरण राठोड याच्याविरुध्द दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी व गर्दी मारमारी अश्याप्रकारचे पिं.चि. आयुक्तालयाच्या अभिलेखावर एकुण ३५ गुन्हे दाखल असुन तो निगडी आणि सांगवी पोलीस स्टेशन येथील गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी आहे. आरोपींना उघड गुन्हयाचे पुढील तपासकामी संबधित पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात येत असुन दिघी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजि. नं ५४२ / २०२२ या गुन्हयाचा पुढील तपास दरोडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख हे करीत आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी ही विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह पोलीस, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, सतिश माने सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार राजेश कौशल्ये, सुमित देवकर, गणेश सावंत, विनोद वीर, आशिष बनकर, गणेश हिंगे, गणेश कोकणे, उमेश पुलगम, समिर रासकर, अमर कदम, महेश खांडे, नितीन लोखंडे, सागर शेडगे, राहुल खारगे, चिंतामण सुपे व औदुबर रोगे सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा व टी. ए.डब्ल्यु विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.
दिवंगत पोलीस नाईक (१४९१) राजेश कौशल्ये यांनी देखील तपासात महत्वपूर्ण जबाबदारी बजावली होती. आरोपींना अटक केल्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांचा दुर्देवाने गंभिर अपघात होवुन उपचारा दरम्यान (दि. १४) रोजी रुबी हॉस्पीटल, पुणे येथे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यु पश्यात त्यांचे अवयव दान करून समाजासाठी एक मोठा आदर्श निर्माण केला आहे…















