न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२३) :- लोकसभेचे वारे वाहू लागल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा बैठकांचा जोर वाढू लागला आहे. शिवसेनेच्या वतीने (दि. १९) शनिवारी शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी विधानसभा पदाधिकारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनेते कामगार नेते इरफानभाई सय्यद, पुणे जिल्हा निरीक्षक विकास रेपाळे, युवा सेना प्रमुख शिरूर लोकसभा सचिन बांगर, उपजिल्हा प्रमुख संभाजी शिरसाठ, भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव उपस्थित होते.
शिवसेना पुणे जिल्हा निरीक्षक विकास रेपाळे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटना, पदाधिकारी नियुक्ती, कार्यकर्त्यांच्या अडचणी, युवा संघटन, महिला सबलीकरण, शासकीय योजना, शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री आरोग्य निधी, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य निधी तसेच शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी, शासकीय विकास निधी अशा अनेक विषयांवर त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी भोसरी विधानसभा शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात उपशहर प्रमुख बळीराम जाधव, रामदास गाढवे, युवा उपजिल्हा प्रमुख अरुण जोगदंड, शहर प्रसिद्धी प्रमुख सुनील पवार, युवासेना जिल्हा समन्वयक सागर पाचारणे, वाहतूक आघाडी प्रमुख मानसिंगराव जाधव, महिला विधानसभा संघटिका जानवी पवार, महिला समन्वयक गौरीताई शेलार, संघटक किशोर सवाई, समन्वयक विशाल लांडगे, विभाग प्रमुख सुरेश सूर्यवंशी, दिनेश घाडगे, दिनकर जाधव, राहुल पिंगळे, दादा बांगर, चांगदेव केदार, सौरभ केंगार, युवा सेना उपशहर प्रमुख रोहित जगताप, दत्ता औराळे, समन्वयक प्रदीप बालघरे, आशिष गौड, संदीप जाधव व इतर पदाधिकारी शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.















