न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- श्रावणांतील पहिला सण नागपंचमी. या दिवशी नागाची पूजा करून त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय सणसमारंभ हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देत असतात.
नागपंचमी निमित्ताने स्वी सदस्य दिनेश लालचंद यादव यांच्या वतीने चिखली गावातील व परिसरातील सर्प मित्रचा सत्कार करण्यात आला. सर्प पकडताना सर्पमित्रांची सुरक्षा व्हावी तसेच सर्पांना इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी.
सर्पमित्रांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये नोंदणी करून घ्यावी. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होते आणि सर्प बचावाच्या दस्तावेजीकरण आणि गैरप्रकारांना आळा बसण्याच्या कामास मोठी मदत होऊ शकते असे मत सदस्य प्रतापभाई दिनेश यादव यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शंभु लोंढे, विशाल पाचुंदे, ओमकार देशमाने , दिपक घन, रोहित कदम उपस्थित होते.















