न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा योग जुळून आल्याने चिंचवडगावातील प्राचीन शिवालय धनेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.
चिंचवडचे हे प्राचीन शिवालय असून दरवर्षी श्रावण महिन्यात या शिवालयात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. यावर्षी श्रावणापूर्वी अधिक महिना देखील आल्यामुळे संपूर्ण महिनाभर मंदिरात भाविकांची गर्दी होती.
त्यात आज मराठी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमी हा योग जुळून आल्यामुळे भाविकांनी प्राचीन धनेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती, अशी माहिती धनेश्वर विश्वस्त मंडळ ट्रस्टच्या सभासदांनी दिली.