- नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- रहाटणी-पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस सुरू होणार आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पत्रव्यवहाराद्वारे तसे कळविले आहे.
नाना काटे यांनी पोस्ट ॲाफीस व महापालिका विभाग यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागत ८० हजार ते १ लाख व त्यापेक्षा जास्त लेकसंख्या आहे. या परिसरात खासगी व सरकारी शाळा, महाविद्यालये, तसेच संरक्षण विभागाचे कार्यालय, निवास्थान, सरकारी व खासगी बँकांची व आयटी पार्कचे कार्यालयं आहेत.
परिसरातील नागरिकांना पोस्ट ॲाफीसबाबत कामे करण्यासाठी औंध किंवा पिंपरी, चिचवडच्या पोस्ट ॲाफीसमध्ये जावे लागते. नागरिकांना याचा त्रास व मोठी गैरसोय होत असल्याचे पोस्ट ॲाफीस विभाग व मनपा विभाग यांच्या निदर्शनास आणुन दिले होते. त्यासाठी रहाटणी पिपंळे सौदागर येथे नविन पोस्ट सुरू व्हावे यासाठी २०१२ पासून पत्रव्यवहार देखील नाना काटे व शितल काटे यांनी वेळोवेळी पोस्ट ॲाफीस विभाग व महापालिका यांच्याकडे केला होता. सातत्याने प्रयत्न देखील करीत होते. त्यांना नवीन पोस्ट ऑफिससाठी लागणारी महापालिकेची पर्यायी जागा देखील सुचविली होती. त्याची पाहणी देखील मनपा व पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत केली होती. त्यास यश आले असून पोस्ट ॲाफीस विभाग व महापालिका यांनी रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात पोस्ट ऑफिस उभारणीसाठी प्रशासकीय कामास सुरूवात केली आहे. तसे पत्राद्वारे देखील त्यांनी कळविले आहे. त्यामुळे रहाटणी पिंपळे सौदागर परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरु होणार असल्याने नागरिकांची पोस्ट ॲाफीसची वणवण आता संपणार आहे, असे या पत्रात नाना काटे यांनी म्हटले आहे.


















