- चाकण-शिक्रापुरमधील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२३) :- हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या उरण ते चाकण-शिक्रापुर या एलपीजी गॅस पाईपलाईनमधील एलपीजी गॅसची चोरी करण्याच्या उदेशाने आरोपी अज्ञात व्यक्तीने एलपीजी गॅस कंपनीच्या पाईप लाईनला टॅपींग करुन त्याला होज पाईप बसवला. त्याला पुढील बाजूस वॉल बसवून एलपीजी गॅस चोरी करण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने पेट्रोलियम आणि खनीज पाईपलाईन (जमिनीच्या वापरकर्ता अधिकारांचा अधिकार) सुधार अधिनियम सन १९६२ चे कलम १५ (२) चे उल्लंघन केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. २६) रोजी फोटान कंपनीजवळ, शिंदे ता. खेड, जि. पुणे येथे उघडकीस आली.
फिर्यादी शिवशंकर व्यंकटराव मस्की यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ५२२/२०२३ पेट्रोलियम आणि खनीज पाईपलाईन (जमिनीच्या वापरकर्ता अधिकारांचा अधिकार) सुधार अधिनियम सन १९६२ चे कलम १५ (२) अन्वये अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शिंदे पुढील तपास करीत आहेत.












