न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२३) :- टाटा कंपनीची बस (एमएच१४सीडब्ल्यू२२८०) वरील चालक आरोपीने त्याच्या ताब्यातील बस हयगयीने, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने चालवली. सुझुकी दुचाकीला (एमएच१२युएक्स२८९७) समोरुन धडक दिली. त्यात अभिजीत संजय किरवे यांचा गंभीर जखमी होऊन अपघातात मृत्यू झाला. आरोपी मयताच्या मृत्यूस कारणीभुत झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २६) रोजी सायं. ६.४५ वाजेच्या सुमारास रक्षक चौक, पिंपळे निलख कडुन वाय जंक्शन चौक, पिंपळे निलख, पुणेकडे जाणा-या बीआरटी मार्गात घडला.
आरोपी चंद्रकांत गुरप्पा विटकर याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ४५५/२०२३ भा.दं.वि कलम २७९,३३८, ३०४ (अ), मो. वा.का. कलम १८४, ११९/१७७ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोउपनि गावंडे पुढील तपास करीत आहेत.











