- तिघांनी संगनमताने ६२ दुकाने केले फर्मच्या नावावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- तिघांनी संगणमत करून फिर्यादीच्या भोसरी येथिल सेक्टर नंबर ११, प्लॉट नं. १ येथील एकुण क्षेत्र ४४०० चौ.मी. या क्षेत्रावर पी ३ डेव्हलपर्स भागीदारी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या प्रसन्न गोल्डफिल्ड या प्रकल्पातील ६२ दुकाने अप्रामाणिकपणे / कपटाने त्यांच्या स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे केले. तसेच फिर्यादी यांनी तिघांना आगाऊ रक्कम घेवुन विक्री केली असताना (दि. २३/०५/२०२३) रोजी ११ वेगवेगळ्या दस्ताद्वारे करारनामा करून एकुण ६२ दुकाने आरोपी यांनी त्यांच्या स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे केले आहेत. त्यामध्ये फिर्यादी यांनी तिघांना विक्री केलेल्या १६ दुकानांचा समावेश आहे. आरोपी यांना अधिकार नसताना सुमारे ११,२३,२०,००० रुपये किंमतीचा अपहार करुन एकूण ६२ दुकाने, ऑफिसेस स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थाच्या नावे ११ वेगवेगळया दस्ताद्वारे करारनामा करून फिर्यादी यांची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २४ /०५/२०२३) रोजी सेक्टर नंबर ११. प्लॉट नं. १ वेबील प्रसन्न गोल्डफिल्ड च्या ऑफिसमध्ये घडली. फिर्यादी प्रदीप पोपटलाल कर्नावट यांनी आरोपी १) प्रशांत मणिलाल संघवी, २) संदेश मिश्रीलाल चोपडा, प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ३८३/२०२३. कलम ४०६,४१८, ४२०.४२१, ४६५.४६७,४६८,३४ भादंवि प्रमाणे तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोउपनि चव्हाण पुढील तपास करीत आहेत.












