न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- वृद्ध इसम हे रस्ता क्रॉस करताना आरोपी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील टाटा इंडीका कार (एमएच१४डीटी७२२८) ही हयगईने, अविचाराने, निष्काळजीपणे, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवली. फिर्यादीच्या वृद्ध वडीलांना धडक देऊन त्यांचा अपघात केला.
अपघातात त्यांच्या डोक्याला, कपाळाला व दोन्ही हाताला किरकोळ व गंभीर दुखापत झाली. त्यामुळे फिर्यादीच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युस आरोपी वाहनचालक कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा अपघात (दि. २७) रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास इंद्रायणी चौक, इंद्रायणीनगर, भोसरी येथील उषाकिरण हॉटेलसमोर घडला.
महीला फिर्यादी यांनी आरोपी विशाल जोसेफ लोंढे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ३८१/२०२३ भादवि कलम २७९, ३३७, ३३८,३०४ (अ) सह मो वा कायदा कलम १८४.११९ / १७७ प्रमाणे आरोपी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि तरंगे पुढील तपास करीत आहेत.












