न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- संगनमताने मिळून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये फिर्यादी यांना चांगला फायदा होईल (खरेदी विक्रि करण्यासाठीची माहिती), असे आमिष दाखविले. फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि GEE / CAE या फसव्या क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग अॅप्लीकेशनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादीकडून रुपये १,२७,२९,७०० (एक कोटी सत्ताविस लाख एकोणतिस हजार सातशे रुपये) रक्कम फसवणूकीने प्राप्त करुन घेतली. सदर रक्कम स्वत:च्या फायदयाकरीता वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फसवणुकीची ही घटना (दि. १३/०६/२०२३ ते आज पर्यंत इंद्रायणीनगर, भोसरीतील फिर्यादी यांच्या राहत्या घरी घडली. फिर्यादी जगदिश दत्तात्रय मुळे यांनी आरोपी व्हाटसअॅप क्रमांक (१) ६०११२११४५२९० (२) ९१०००११२०६९९ (३)+९१८३०५०५१३७९ (४) +९१८२९२३०८८९९ (५) ६२८९८९७३७३३०४ टेलीग्राम आयडी (१) scavs १९६६ (२) alyssa १९५७ चे वापरकर्ते १) सँग २) मिस अॅना कर्दशियन ३) आलस्या अशी नावे सांगणाऱ्या इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ३८२/२०२३ भा.दं.वि. कलम ४१९.४२०, ४०६ सह माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. वपोनि निकाळजे पुढील तपास करीत आहेत.












