न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- छत्रपती संभाजीनगर येथे तिसरी महाराष्ट्र राज्यस्तरीय साम्बो स्पोर्ट चॅंपियन शिप स्पर्धा नुकतीच पार पडली. १५९ देशांतून या स्पर्धा दरवर्षी होतात. प्राधिकरणमधील न्यू पूणे पब्लिक स्कूलची टीम शाळेतर्फे गेली होती.
वय आणि वजन यावर झालेल्या स्पर्धेत शाळेने तिसरा क्रमांक पटकावला. एकूण ३७ मेडल्स विद्यार्थ्यांनी मिळविली. क्रिडा शिक्षक मनिषा पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापनमधील प्रकाश खंदारे आणि प्रदीप खंदारे यांनी प्रोत्साहन दिले.












