न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- मावळ तालुक्यातील रिक्त असलेल्या वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे या शहरांसह ४७ गावच्या पोलिस पाटील पदांची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली असून, त्या अनुषंगाने बुधवारी (दि. ३०) आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील ४७ व मुळशी तालुक्यातील ४९ अशी एकूण १०६ रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पदांची आरक्षण सोडत काढण्यासाठी दि. ३० रोजी सकाळी ११.३० वाजता बावधन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी याठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये नवलाख उंबरे, जांभवडे, मंगरुळ, शिरे, कातवी, बोरिवली, वडेश्वर, घोणशेत, राखसवाडी, कुसगाव खु., कुणेना. मा. सदापुर, खामशेत, बेल्ही शिलाटणे, बोरज, दुधिवरे, मालेवाडी, आपटी, गेंवडे आपटी, आतवण, आंबेगाव, महागांव, येळ कथे, बेडसे करूंज, ब्राम्हणवाडी (बऊर), भडवली, पानसोली, कोळेचाफेसर, तुंग, माजगाव, आंबी, सोमाटणे, दारुंब्रे, चांदखेड होणे, पाचाणे, कुसगाव पमा, वडगाव मावळ, खडकाळा, कुसगाव बु. वलवण, तुंगार्ली, भुशी, तळेगाव दाभाडे या गावांचा समावेश आहे.












