न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय लॉन टेनिस स्पर्धा सन २०२३-२४ या दि २८/०८/२०२३ ते २/९/२०२३ अखेर लॉन टेनिस कोर्ट, डॉ हेडगेवार भवन, आकुर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या स्पर्धेत १०० शाळा सहभागी झाल्या असून त्यामध्ये १४ वर्षाखालील मुले-मुली, १७ वर्षाखालील मुले-मुली, १९ वर्षाखालील मुले-मुली सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा विभागाचे प्रशासन अधिकारी, परशुराम वाघमोडे यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता झाले.
याप्रसंगी क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोने. पंचप्रमुख सरदारसिंह ठाकूर. क्रीडा शिक्षक दादाभाऊ होलगुंडे, दिपक जगताप, पंच श्वेता ठाकुर, भक्ती भापकर, चंद्रकांत पोटघन, अक्षय बोईरे उपस्थित होते.
१९ वर्षाखालील मुलांचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे…
प्रथम : सौरभ कोद्रे (श्री. फत्तेचंद जैन विद्यालय)वि. वि (१२-१०) प्रियांश कांसरा ( इल्प्रो इंटरनॅशनल स्कूल)
द्वितीय : प्रियांश कांसरा (इल्प्रो इंटरनॅशनल स्कूल)
तृतीय : विश्वा जोंधळे (विद्या व्हॅली नोर्थपॉइंट ज्युनिअर कॉलेज)
चौथा : प्रवीण चौधरी (सिटी प्राइड ज्युनिअर कॉलेज)
पाचवा : सोहम भावे (सी.एम.एस.इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कूल)












