न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२३) :- चाकण येथील मेदनकरवाडीतील भगवत वस्ती येथील फिर्यादीच्या मालकीच्या जागेवर (दि. २९) रोजी सकाळी १०.०० च्या सुमारास पाच जणांनी बेकायदेशीर जमाव जमवुन फिर्यादीला धक्काबुक्की केली. त्यांना हाताने व लाथाने मारहाण केली. लोखंडी जाळीला असलेले पोल कापून नुकसान केले. फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देवून शिवीगाळ केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी अजित ज्ञानोबा मेदनकर यांनी आरोपी १) विजय अप्पाजी गवते, २) बाळासाहेब अप्पाजी गवते, ३) अजय बाळासाहेब गवते, ४) प्रशांत बाळासाहेब गवते, ५) अनिकेत बाळासाहेब गवते (सर्व रा. गवतेवस्ती, मेदनकरवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ६८९/२०२३ भा.दं.वि कलम १४३.१४७.१४९.३२३.४२७.५०४.५०६ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि राठोड पुढील तपास करीत आहेत.












