न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल) :- वढू ब्रुदूक येथे छञपती संभाजी महाराज यांच्या ३३० व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट, शिरुर लोकसभेतील युतीचे उमेदवार खासदार शिवाजी आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे हे व्यासपीठ एकत्र आले.
गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली. तसेच अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला.
अमोल कोल्हे म्हणाले की, वढू ब्रुदूक याठिकाणी आलो ते फक्त नतमस्तक होण्यासाठी आलो. निवडणूक असो, नसो याच्याशी काही संबंध नाही. आज जे इतर लोकं भेटले, त्याचा राजकीय काही संबंध नाही. हे स्थान राजकारण विरहीत म्हणून भेटलो, असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला.
सकाळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पुणे ग्रामीण पोलीस आधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली. मोठ्या संख्येनं शंभू भक्त वढू, तुळापुरात दाखल झाले होते.










