न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- लोकमान्य हास्ययोग संघ, लोकमान्यनगर प्रातः शाखा, साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशनस् आणि देव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. २) रोजी शनिवारी डाॕ. नीळकंठ देव यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे “दिवस रसायनीचे” मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.
अध्यक्षस्थानी संघाचे संघप्रमुख बंडोपंत फडके, व्यासपीठावर प्रकाशक व काव्यानंद प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सुनील खंडेलवाल, डॉ. नीलकंठ देव व ज्येष्ठ साहित्यिक व कवी यशवंत देव हे होते.
निवेदनाची धुरा संघाचे शरद महाबळ यांनी अतिशय खुसखुशीत नर्म विनोदांची पखरण करत सूत्रसंचालन केलं. मान्यवरांचे व लेखकाचे सत्कार व सगळ्यांचं समयोचित मनोगत यावेळी झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखाप्रमुख प्रभा भालेराव व उप शाखाप्रमुख शोभना बहिरट यांनी खूप मेहनत घेतली.















