न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- देहूगाव येथील सुनिती विद्यालयं मापुस्कारांचे गुरुकुल स्कूलमध्ये आदित्य एल-१ या सूर्ययान मोहिम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी डमरू वाजवून शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या संचालिका व प्राचार्या सोनाली उल्हास मापुस्कर व शिक्षिका जान्हवी कुलकर्णी यांनी मुलांना आदित्य एल-१ मिशन काय आहे, याची माहिती दिली व जगाच्या पाठीवर ठसा उमटवणाऱ्या भारताची नेत्रदीपक कामगिरी व कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
शाळेतील मुले पद्मश्री डॉ. सुहास मापुस्कर यांच्यासारखे संस्कारी व देशासाठी काहीतरी करणारे विद्यार्थी घडावेत. यासाठी मापुस्कर गुरुकुलमध्ये विविध उपक्रम राबवले जातात, असे सहसंस्थापक व उपाध्यक्ष उल्हास मापुस्कर यांनी सांगितले.















