- तिघांना ठोकल्या बेड्या; पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- मारहाण करून तिघांनी फिर्यादीच्या गळ्यातील १५ तोळे सोन्याची चैन जबरदस्ती हिसकावुन घेतली होती. या चोरीच्या गुन्हयाची चाकण पोलीसांनी अवघ्या १२ तासात उकल केली आहे. तीन सराईतांना अटक करून त्यांच्याकडुन सोन्याच्या चैनसह ३,७०,००० रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल एस. के, चाकण-शिक्रापूर रोड, बहुळ येथे फिर्यादीला तिघांनी लाकडी दांडके व पीवीसी पाईपने मारहाण करुन जखमी करीत त्यांच्या गळयातील ३,२०,००० रूपये किंमतीची अंदाजे १५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडेल बळजबरीने हिसकावुन चोरुन नेले होते. (दि. १) रोजी सायंकाळी हा प्रकार घडला होता. फिर्यादी सतीश कुंडलिक गव्हाणे यांनी आरोपी तिघांच्या विरोधात फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून चाकण पोलिसांनी ६९८/२०२३ भा.द.वि. कलम ३९४,३४ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी आरोपींना खेड येथील होलेवाडी, टाकळकरवाडी तसेच वाकी बु॥ येथे सापळा रचुन शिताफीने अटक केली. १) श्रीराम संतोष होले (वय २५ वर्षे, रा. होलेवाडी ता. खेड जि. पुणे), २) प्रतिक उर्फ बंटी दत्तात्रय टाकळकर (वय २१ वर्षे, रा. टाकळकरवाडी ता. खेड जि. पुणे), ३) बबलु रमेश टोपे (वय २३ वर्षे, रा. वाकी बु. ता खेड जि पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर यापूर्वी चोरी, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना (दि. ५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १, विवेक पाटील सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्र गौर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे तसेच तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोनि / विनोद शेंडकर, पोउनि / सागर बागणे, पोसई अभिजीत चौगुले, सफी/ सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना / हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, पोकों / नितीन गुंजाळ, निखील वर्षे, प्रदिप राजे, सुनिल भागवत, संदिप गंगावणे, मंगेश फापाळे महेश कोळी यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई विनोद शेडकर हे करीत आहेत.













