न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- देहूगाव येथील पद्मश्री विजेते डॉ. सुहासचंद्र विठ्ठल मापुस्कर एज्युकेशन फाउंडेशन संचलित, सुनिती विद्यालयं मापुस्कारांचे गुरुकुल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्म आणि दहीहंडी उत्सव साजरा केला. शाळेतील सर्व बालवाडी ते तिसरी पर्यंतचे विद्यार्थी व शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला.
शिक्षिका नूतन पाटील यांनी मुलांना श्रीकृष्ण जन्माची माहिती दिली व पाळणा गीत गाऊन श्रीकृष्ण जन्म साजरा केला व नंतर दहीहंडी उत्सव केला. राधा कृष्णाच्या वेशभूषेत आलेली सर्व मुली मुले खूप उत्साह होता असे संस्थेच्या संचालिका व प्राचार्य सोनाली उल्हास मापुसकर यांनी सांगितले.
या शाळेतील मुले संस्कारी घडावी यासाठी मापुस्कर गुरुकुल मध्ये विविध उपक्रम राबवले जातात, असे सह संस्थापक व उपाध्यक्ष उल्हास मापुस्कर यांनी सांगितले.