- भाजपचे अमित गोरखे यांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- थरमॅक्स चौकातील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलजवळ आज शुक्रवारी (दि. ८) रोजी सकाळी धावत्या कारने अचानक पेट घेतला. पेट घेताच चालकाने प्रसंगावधन राखून गाडीतून उडी मारली. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, गाडीमध्ये असलेला लॅपटॉप व इतर सामान आणि कार संपूर्णतः जळून खाक झाली.
यावेळी भाजपचे अमित गोरखे यांनी घटनास्थळी पोहोचून अग्निशामक दलाला फोन करून पाचरण केले. दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
शॉक सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांना वेळेत आपल्या वाहनाची तपासणी करावी. जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत, असे आवाहन अमित गोरखे यांनी केले आहे.

















