- गोविंदा पथकांनी सातव्या थरापर्यंत वाढविली दहीहंडीची रंगत..
- चाकणच्या बालवीर गोविंदा पथकाला मिळाला दहीहंडी फोडण्याचा मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२३) :- ‘बोल बजरंग बली की जय’; ‘गोविंदा आला रे आला रे’ च्या तालावर ठेका धरत सातव्या थरावर गोविंदा पथकांनी मोशीत साईनाथ मित्र मंडळाची मानाची दहीहंडी फोडली. तब्बल आठ थरांचा थरारक उत्साह पाहण्याजोगा होता.
दहीहंडी फोडण्याचा मान चाकणच्या बालवीर गोविंदा पथकाला मिळाला. या गोविंदा पथकाने एक्कावन्न हजारांचे बक्षीस पटकाविले. तर सलामीला अकरा हजारांचे बक्षीस गोविंदा पथकाला देण्यात आले. या सोहळ्यात तब्बल पंचवीस गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मधुरा देशपांडे – शुभविवाह फेम, राशी खन्ना – बॉलिवूड टॉलीवुड अभिनेत्री, शिवानी मुंढेकर – मुरंबा फेम यांनी सोहळ्यात हजेरी लावत तरुणाईची मनं जिंकली.
या दहीहंडीच्या कार्यक्रमास मोशीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थिती दर्शवत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला, अशी माहिती आयोजक तथा मा. नगरसेवक वसंतशेठ बोराटे यांनी दिली.