न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२३) :- यूपीआयच्या माध्यमातून आता पैसेही काढता येऊ शकणार आहेत. मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएम दाखविण्यात आले. यात कार्डची गरज लागत नाही. क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढले जातात. हे एटीएम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे.
सध्या ही सुविधा केवळ ‘भीम’ अॅपवर आहे. लवकरच यूपीआय सेवा देणाऱ्या विविध अॅपचा वापर करून एटीएमद्वारे पैसे काढले जाऊ शकतील. मुंबईतील फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएम दाखविले आहे. हळूहळू ते देशभरात उपलब्ध करुन दिले जाईल.
एटीएमवर ‘यूपीआय कार्डलेस कॅशचा पर्याय निवडा. १००, ५००, २,००० आणि ५,००० अशी रक्कम निवडा. एटीएमवर क्यूआर कोड येईल, तो स्कॅन करा. यूपीआय पिन नोंदवा. रोख रक्कम बाहेर येईल.
एटीएममध्ये पैसे डेबिट कार्डद्वारे पैसे काढताना कधी कधी पैसे मशीनमध्ये अडकतात, तसे यूपीआय एटीएमच्या बाबतीत झाल्यास ग्राहक बँकेत जाऊन तक्रार नोंदवू शकतो.