न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२३) :- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा जिल्हा रुग्णालयांतर्गत असणाऱ्या आळंदी ग्रामीण रुग्णालयात शिपाई या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीकडून ऑनलाईन ३०,००० रुपये व रोख स्वरुपात ७०,००० रुपये असे एकूण १,००,००० रूपये घेवून फिर्यादीला खोटा नियुक्ती आदेश देत त्यांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २१/०७/२०२३ रोजी ते दि. १७/०८/२०२३ रोजी पर्यंत) सर्व्हे नं. १५४, साईराम बिल्डींग जवळ, रामनगर, बोपखेल आणि भिंगार ता.जि.अ.नगर व आळंदी ग्रामीण रुग्णालयात घडला.
फिर्यादी सागर शिवराम आगवान यांनी प्रद्युम्न नारायण चव्हाण (वय २७ वर्षे, रा. ग्रामिण रूग्णालयाजवळ, इंदापूर जि. पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी २३२/२०२३ भादवि. ४२०, ४६८, ४७१, ४७४ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गायकवाड पुढील तपास करीत आहेत.









![[आळंदी]:- ग्रामीण रुग्णालयात शिपायाची नोकरी लावण्याचे आमिष पडले लाखाला...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/निवड-युवक-अध्यक्ष-90x60.jpeg)
![[आळंदी]:- ग्रामीण रुग्णालयात शिपायाची नोकरी लावण्याचे आमिष पडले लाखाला...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-3-2-90x60.jpeg)




