न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२३) :- संगनमत करुन आरोपी क्रमांक १ याने फिर्यादीला फेसबुक व वॉटसअप या अॅपवरुन मेसेज केला. फिर्यादीचा विश्वास संपादन करुन आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवले. तसेच आरोपी क्रमांक २ याने फिर्यादीला फॉरेस्ट डिपार्टमेंट, दिल्ली येथून बोलत असल्याची तोतयागिरी करुन त्यांनी वेगवेगळी कारणे सांगुन फिर्यादीकडून एकुण रु. १६,६२,००० रक्कम घेवुन त्यांचे पैसे परत न देता त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि ०७/०१/२०२३ ते दि.१८/१/२०२३ रोजी) दरम्यान सेक्टर नं.०९, मोशी, प्राधिकरण येथे घडला. महीला फिर्यादी यांनी आरोपी १) मोबाईल क्रमांक ४४७९१७८२३७४५ व ४४७४६९३४९२८१ या नंबरवरुन वॉटस अपव्दारे तसेच फेसबुकवरुन मेसेज करणारी केल्वीन पॅट्रीक या नावाची अनोळखी व्यक्ती, २) मोबाईल क्रमांक ८७९४६४०४५७ या नंबरवरुन टीनीया नावाने बोलणारी अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ३९५/२०२३ भा.द.वि कलम ४१९, ४२०,३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६, ६६ डी नुसार गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पांचाळ पुढील तपास करीत आहेत.










![[मोशी] दिल्लीतील फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून बोलत असल्याच्या तोतयेगिरीला भुलून लाखो गमाविले...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/img-20210506-wa0085_202105611939-90x60.jpg)
![[मोशी] दिल्लीतील फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून बोलत असल्याच्या तोतयेगिरीला भुलून लाखो गमाविले...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-3-5-90x60.jpeg)



