- दोघांना बीडमध्ये सापळा लावुन देहुरोड पोलीसांकडुन अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२३) :- तब्बल अकरा मोटार सायकलींची चोरी करून त्या मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेवुन त्यांच्याकडुन पैसे खात्यावर घेवुन त्यांची फसवणुक करणाऱ्या चोरट्यांना देहुरोड पोलीसांकडुन अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी देहुरोड पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. ४७८/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. दरम्यान गुन्ह्याच्या तपासा दरम्यान प्लीसनी परिसरातील ५०-६० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक केले. त्यामध्ये दोन इसम मोटार सायकल चोरी करून घेवुन गेल्याचे निष्पन्न झाले. आरोपी बीड येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने देहुरोड तपास पथकाने आरोपी १) अम्रत भाऊसाहेब देशमुख (वय ४६ वर्षे, रा. मु. कान्नापूर, पो. सिरसाळा, ता. धारूर, जि. बीड), २) फारूक शब्बीर शेख (वय ३७ वर्षे, रा. मोहा रोड, सिरसाळा, ता. परळी बीड) यांना सिरसाळा, जि. बीड येथुन सापळा लावुन ताब्यात घेतले. त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड मिळुन त्यांच्याकडे केलेल्या तपासात तसेच तांत्रीक तपासादरम्यान देहुरोड, सांगवी. हिंजवडी, आळंदी, औरंगाबाद, घोडेगाव, अहमदनगर येथुन चोरी केलेल्या ८,००,००० रुपये किंमतीच्या ११ मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
चोरी केलेल्या मोटार सायकलीपैकी ०६ मोटार सायकली आळंदी मरकळ रोड, लोणीकंद, करंदी, भोसे, चाकण, कुरळी परिसरातील वेगवेगळ्या मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेवुन त्यांचेकडुन पैसे ट्रान्सफर करून घेवुन पैसे परत घेवुन येतो, असे सांगुन त्यांची फसवणुक केली आहे. अटक आरोपींकडुन देहुरोड पोलीस स्टेशनचे ०३ गुन्हे, आळंदी पोलीस स्टेशनचे ०३ गुन्हे, सांगवी, हिंजवडी, क्रांतीचौक पो.स्टे औरंगाबाद शहर, सोनई पो.स्टे. जि. अहमदनगर पोलीस स्टेशन येथे प्रत्येकी एक असे एकुण १० गुन्हे उघडकीस आणण्यात देहुरोड पोलीसांना यश आले आहे. उर्वरीत ०१ मोटार सायकलबाबत देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो. श्री. विनय कुमार चौबे सो, मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे सो मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ डॉ. काकासाहेब डोळे सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री. पचाकर घनवट सो.. पोलीस निरीक्षक श्री. दिगंबर सुर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे पोलीस अंमलदार बाळासाहेब विधाते, सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, निलेश जाधव, युवराज माने, सचिन शेजाळ, स्वप्नील साबळे, संतोष महाडीक यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.