- जवळपास चारशे दुकानदारांना घातलायं गंडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२३) :- ‘ऑनलाईन पेमेंट करतो’ असे सांगुन पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील व्यवसायिकांना गंडा घालणारी बंटी व बबली पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ च्या अलगद जाळयात फसले. एकुण ०६ गुन्हे उघड करुन ३०० ते ४०० व्यवसायिकांना लुटल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला व पुरुष यांनी कपडयाच्या दुकानात येवुन कपडयांची खरेदी करुन ऑनलाईन पेमेंट करतो, असे सांगुन ऑनलाईन पेमेंटचा ट्रान्झेशन सक्सेस फुल असा खोटा स्क्रिन शॉट दाखवुन विकेत्याची फसवणुक केल्याने वाकड पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ८९५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ आय. टी. अॅक्ट ६६ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद होता.
त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे तसेच सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार हे दाखल गुन्हयाचा तपास करत असताना घडलेल्या गुन्हयाचे पोशि/प्रशांत सैद यांनी सखोल तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी निष्पन्न केला. परंतु आरोपी हा खुप चालाक होता तो व्यवसायिकांना फसवल्यानंतर फसवणुक करणारा मोबाईल नंबर हा जागेवरच स्विच ऑफ करत असे. तसेच तो वेळोवेळी नविन मोबाईल नंबरचा वापर करत होता. तसेच त्याचे राहण्याचे ठिकाण देखिल तो बदल होता. परंतु केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरुन सदर आरोपी हा रहाटणी वाकड परिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, पोशि/ प्रशांत सैद, सुखदेव गावंडे यांनी आरोपी गणेश शंकर बोरसे (वय-३४ वर्षे, रा-काकडे यांची रुम, पठारे वस्ती, लोहगाव, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता सदर आरोपी व त्याची पत्नी प्रिया गणेश बोरसे (वय-२८ वर्षे, रा-सदर) हे दोघे तसेच काही ठिकाणी त्यांच्या दोन लहान मुलांसह जावुन मागील दोन-तीन वर्षा पासुन सर्व जिवनावश्यक वस्तु तसेच मौजमजेच्या वस्तु हे दोघे दुकानात जावुन दुकानदाराशी गोड बोलुन विश्वास संपादन करुन वस्तु खरेदी करत असे. तसेच काही व्यवसायिकांकडुन खर्चासाठी रोख रक्कम नाही असे सांगुन रोख रक्कम देखिल घेत. तसेच खरेदी केलेल्या वस्तुंचे बिल व रोख रक्कम असे मिळून ऑनलाईन पेमेंट आहे का असे विचारून एन.ई.एफ.टी व्दारे आय.सी.आय.सी.आय बँकेच्या बैंकिंग अॅप व्दारे खोटे सक्सेस पेमेंट झाल्याचा स्क्रिन शॉट व्यवसायिकांना दाखवत होता. तसेच तो व्यवसायिकांना सांगत असे की एन.ई.एफ.टी व्दारे केलेले पेमेंट हे २४ तासाच्या आत येते. जर पेमेंट आले नाही तर तो त्यांना स्वतःचा मोबाईल नंबर देत असे व दुकानदारांना विश्वास बसण्यासाठी त्याच्या नंबरवर मिस कॉल मारण्यास सांगत होता. त्यानंतर दुकानदारांचा विश्वास बसल्यावर तो सामान घेवुन जात व बाहेर गेल्यावर लगेचच सदर दुकानदाराचा मोबाईल नंबर ब्लॉक लिस्टला टाकत होता, त्यांनतर लागलीच मोबईलमधुन त्याच्या नंबरचे सिमकार्ड काढून ठेवत असे.
त्यानंतर पुन्हा ज्यावेळी तो अशी खरेदी करण्यास जात असे त्यावेळी ते सिमकार्ड पुन्हा टाकत असे. तो जो मोबाईल नंबर दुकानदारांना देत होता तो इतर व्यक्तीच्या नावावर होता तसेच त्याने त्यानंबर वरून दोन वर्षा मध्ये एकाही व्यक्तीला आऊटगोविंग कॉल केला नाही. तसेच तो वेळोवेळी नवनविन सिमकार्डचा वापर करत असे तसेच त्याचे राहण्याचे ठिकाण देखिल एक नव्हते. तसेच आपण पकडले जावु नये म्हणुन तो पुरेपुर काळजी घेत होता पकडले जावु नये म्हणुन स्थाने बायकोला मोबाईल फोन वापरुन दिला नाही. सदर आरोपीचे एफ.वाय.बी.एस.सी पर्यंतचे शिक्षण झाले असुन त्याने आता पर्यत पेरु, आंबे, पानीपुरी, किराणा, मेडीकल, केक, मसाले, हार, गादी, सायकल, लॅपटॉप, इलेक्ट्रीक वस्तु, स्टेशनरी, गिफ्ट हाऊस, नर्सरी अशा ३०० ते ४०० व्यवसायिकांना फसवल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्याचे कडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आणले आहेत. तसेच त्याची पत्नी नामे प्रिया गणेश बोरसे, वय-२८ वर्ष, रा-सदर हिला देखिल अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड हे करत आहेत.
१) वाकड पोलीस ठाणे. गु.र.नंबर- ८९५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ आय. टी. अॅक्ट ६६ (ड)
२) वाकड पोलीस ठाणे. गु.र.नंबर-८९९/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१,३४ आय.टी. अॅक्ट ६६ (ड)
३) सांगवी पोलीस ठाणे, गु.र.नंबर-४८७/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१,३४ आय. टी. अॅक्ट ६६ (ड) ४) भोसरी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ७३५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१,३४ आय. टी. अॅक्ट ६६ (ड)
५) रावेत पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ३३३ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१,३४ आय. टी. अॅक्ट ६६ (ड) ६) भोसरी एम.आय.डी.सी पो ठाणे, गु.र.नंबर-३९६ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४७१,३४ आय. टी. अॅक्ट ६६ (ड)
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे सो सह पोलीस आयुक्त मा श्री डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. बसत परदेशी सो, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री. सविष माने सो. याचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, सहा. पो.उप.नि, नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिसाळ, आबासाहेब किरना, पोहा प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आहे, पोना वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, सुखदेव गावडे तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सपोनि सागर पानमंद, पोहवा/नागेश माली पनितेश विधेवार, पोपट हुलगे यांनी केली आहे.