न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२३) :- वॉशिंग सेंटरवर तीन अनोळखी इसम त्यांच्या लाल रंगाच्या टू व्हिलर पल्सर (एमचएच१४केपी४८०६) गाडीवर आले. फिर्यादीकडे ‘पॅशन प्रो टू व्हिलर गाडी कोणाची आहे’, अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादी त्यांना मालकाची आहे, असे म्हणाले. दरम्यान तिघांनी अचानक फिर्यादीला लाथाबुक्कयांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.
त्यावेळी फिर्यादी मोठयाने ओरडले. फिर्यादीच्या पॅन्टच्या उजव्या खिशातील ५,००० रुपये आणि सॅमसंग गॅलेक्सी सी – ९ प्रो मोबाईल बळजबरीने हिसकावून काढून घेत आरोपी त्यांच्या गाडीवर निघून गेले. हा प्रकार (दि. १०) रोजी रात्री ९.०० च्या सुमारास कासारसाई चांदखेड रोड, डी मार्ट गोडावून समोर, चांदखेड येथे घडला.
फिर्यादी गणेश जर्नादन ढाले यांनी आरोपी १) अभिजीत आबासाहेब मोरे (वय १९ वर्षे रा बळवंत कॉलनी गट नं १६ वाल्हेकरवाडी),२) गोविंद गोकुळ सोनवणे (वय २१ वर्षे रा वाल्हेकरवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात २६८ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोउपनि गाडीलकर पुढील तपास करीत आहेत.