न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२३) :- भरधाव वेगात हयगयीने व निष्काळजीपणाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन आरोपीने त्याची टाटा कंपनीची नेक्सॉन गाडी [MH१२SQ०३३६) चालवली. फिर्यादीच्या होन्डा कंपनीच्या अॅक्टीवा गाडी (MH१४KY९९२६) ला धडक दिली. त्यात फिर्यादीच्या गाडीचे नुकसान करुन फिर्यादीच्या दोन्ही पायांना दुखापत करण्यास आरोपी कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ४) रोजी १०.१५ वा. सुमारास बीआरटी रोडमधुन आल्यावर कोहिनुर बिल्डींग समोर, रावेत येथे घडली. फिर्यादी दिपक आप्पा धर्मे यांनी आरोपी स्वप्नील शिवकुमार दावनगावे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलीस ठाण्यात ३३४ / २०२३ भा.द.वि. कलम ३३७,२७९, ४२७ सह १८४ मो. वा. का. प्रमाणे आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोहवा डामसे पुढील तपास करीत आहेत.









![[रावेत]:- टाटा नेक्सॉनच्या धडकेत अॅक्टीवावरील दुचाकीस्वार गंभीर जखमी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/image_380x226_649bf9ade8b42-90x60.jpg)
![[रावेत]:- टाटा नेक्सॉनच्या धडकेत अॅक्टीवावरील दुचाकीस्वार गंभीर जखमी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/maruti-omni-ambulance-90x60.jpg)




