न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्यूनियर कॉलेज विद्यालयाने सहभाग नोंदविला होता. नुकतेच अजमेरा स्केटिंग ग्राउंड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्केटिंग चॅम्पियनशीप २०२३ या स्पर्धेचे आयोजन केले होते.
८ वर्षाखालील वयोगटात प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्यूनियर कॉलेज इ. २ रीचा विद्यार्थी पल्लव तोडके या विद्यार्थ्याने स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल या विद्यार्थ्यास पारितोषिक व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कॉलेजच्या प्राचार्या सविता ट्रॅव्हीस, उपप्राचार्या लिजा सोजू, कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा यांनी विद्यार्थ्याने मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.















