- भक्तांकरीता पासेसची येथे आहे सोय; ही आहेत कागदपत्रं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- ‘गणेशोत्सव २०२३’ या कालावधीत कोकणात जाणा-या गणेशभक्तांना गणेश उत्सवानिमीत्त पथकर माफी (TOLL) आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढला आहे.
त्या अनुषंगोन पिंपरी चिंचवड शहरातील गणेश उत्सव कालावधीत कोकणात मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८) या मार्गाने जाणा-या गणेश भक्तांकरीता पासेस देण्याची व्यवस्था सर्व विभागीय वाहतुक कार्यालयामध्ये सकाळी ०८.०० ते रात्री ०८.०० तसेच नियंत्रण कक्ष वाहतुक शाखा येथे (२४ तास) करण्यात आलेली आहे.
पास प्राप्त करण्याकरीता वाहन चालकाने वाहन चालक परवाना आणि वाहन नोंदणी पुस्तक/स्मार्ट कार्ड यांची छायांकित प्रत संबंधीत प्रभारी अधिका-यांकडे सादर करावी. आपल्या नजीकच्या वाहतुक विभाग कार्यालयाच्या माहितीकरीता मोबाईल क्रमांक ९५२९६८१०७८ (मुख्य नियंत्रण कक्ष, वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड) यावर संपर्क करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गणेशोत्सवाकरीता कोकणात जाणा-या सर्व गणेशभक्तांना करण्यात आले आहे.