न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- पुजेसाठी फुले खरेदी करण्याकरिता दुकान चालु आहे का? हे पाहण्यासाठी फिर्यादी रस्त्याने जात होते. हॉस्पीटल समोरील सार्वजनिक रोडवर आरोपीने फिर्यादीला दगडाने मारहान केली. फिर्यादीच्या गळयातुन १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व लेदरचे पाकीट, त्यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, ५ क्रेडीट कार्ड व ३ डेबीट कार्ड असे जबरदस्तीने ओढुन चोरुन नेले आहेत, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १४) रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास गणाधिश हॉस्पीटल समोर, चाफेकर चौक, चिंचवडगाव येथे घडला. फिर्यादी संदेश रमेश शिंदे यांनी आरोपी गौरव ऊर्फ कैची ज्योतीराम जोगदंड यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चिंचवड पोलीस ठाण्यात ४५३/२०२३ भादवि कलम ३९४,३२३,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पो. उपनिरी. तलवाडे पुढील तपास करीत आहेत.










![[चिंचवडगाव]:- दिवसाढवळ्या दगडाने मारहाण करीत ऐवज लुटला...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/toll-90x60.jpg)
![[चिंचवडगाव]:- दिवसाढवळ्या दगडाने मारहाण करीत ऐवज लुटला...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/650x_2018082819125998-90x60.jpg)



