न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२३) :- घरातील बजाज कंपनीचा गिझर खराब झाला. तो दुरुस्त करण्यासाठी फिर्यादी यांचे सासरे यांनी गुगलवर सर्च करुन फिर्यादीला बजाज इलेक्ट्रीकल सर्विसेसचा मोबाईल नंबर पाठवला. फिर्यादी त्यांचेशी फोनवरून बोलले असता, तो व्यक्ती बजाज कंपनीचा एम्पलॉय आहे, असे सांगुन त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
फिर्यादीस गीजर दुरुस्त करण्यासाठी बजाज कंपनीची मेंबरशिप घेण्यास सांगितले. फिर्यादीस अॅप डाऊनलोड करायला लावुन त्याद्वारे फिर्यादीकडुन प्रथम आयसीआयसीआय बँकेतुन प्रथम ९१,०६५ रुपये व नंतर १९५० रुपये व नंतर लोन स्वरुपात रुपये ३,००,००० रुपये तसेच एसबीआय खातेमधुन १,४७,००० रुपये असे एकुण ५,४०,००० रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ११) रोजी दुपारी १२.३० ते २.३० च्या दरम्यान हिंजवडी फेज २ व हिंजवडी फेज ३ येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी मोबाईल नंबर धारकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी १०८२/२०२३ भादवि कलम ४०६,४२०, माहीती तंत्रज्ञान अधिनिअम (सुधारीत) २००८ चे कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे. सपोनि देशमुख तपास करीत आहेत.