न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२३) :- शॉपमधील कामगाराला झालेल्या मारहाणीच्या कारणावरुन आरोपी क्रं १ याच्या सांगण्यावरुन आरोपीचा मुलगा आरोपी क्रं २ व इतर २ अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या वडीलांना ‘ए थांब तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणुन हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या वडीलांच्या पाठीत मारले.
त्यामुळे फिर्यादी यांचे वडील खाली पडले. मारहाणीत फिर्यादीच्या वडीलांच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार (दि. १६) रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास फिर्यादी व फिर्यादी यांचे वडील आपआपल्या दुचाकीवरुन नाशिक पुणे हायवेने राहत्या घरी जात असताना बर्गेवस्ती फाटा, कुरुळी येथे फिर्यादी यांच्या शॉपच्या समोर घडला.
फिर्यादी शुभम गोविंद भिसे यांनी आरोपी १) दत्ता डोके, २) शकुंतल डोके, ३) दोन अनोळखी इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ५६४ / २०२३ भादवि कलम ३२६,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शिंदे पुढील तपास करीत आहेत.