- इतक्या वाजेपर्यंत सुरु राहणारा शहरातील मेट्रो…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२३) :- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे यावर्षी प्रथमच मेट्रो रेल्वेने जोडली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे शहरातील गणपती पाहण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मेट्रो प्रशासनाने गणेशोत्सव काळात मेट्रो मध्यरात्री १२ पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी लाखो रुपये खर्च करून पुण्यातील गणेश मंडळ जिवंत देखावे आणि देशातील विविध देवांची मंदिरं साकारण्याचा प्रयत्न करतात. पुण्यातील जिवंत देखाव्यांची देशभरात वेगळीच ओळख आहे. हे सगळे देखावे पाहण्यासाठी उपनगरातून व बाहेरगावाहून नागरिकसुद्धा शहराच्या मध्यवर्ती भागात येत असतात. देखावे रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे नागरिकांना बऱ्याच वेळा घरी जाण्यासाठी खासगी वाहनं किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. रात्री उशिरा प्रवासाची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मेट्रो प्रशासनाने गणेशोत्सव काळात २२ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत आणि २८ सप्टेंबरला सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
२२ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत आणि विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच २८ सप्टेंबरला सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत मेट्रो सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.