- काकावर वरचढ होणाऱ्या पुतण्याची राजकीय महत्वकांक्षा केली उघड..
- राष्ट्रवादीला एकसंध ठेवण्यात आमदार रोहित पवारांचा अडसर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२३) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आधी आमदार रोहित पवार यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. रोहित पवार हे आम्ही सत्तेत गेल्यावर ते अजित पवार यांची जागा घेऊ पाहत आहेत, असा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी केला.
आमदार शेळके म्हणाले, “२० जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २२ जून २०२२ रोजी रोहित पवार पक्षातील मंत्री आणि नवीन आमदारांना घेऊन अजितदादांकडे गेले होते. मात्र त्यांनी शरद पवारांची परवानगी आणायला सांगताच रोहित पवार आम्हाला शरद पवारांकडे घेऊन गेले. त्यामुळे रोहित पवारांनी आमचा स्वार्थ काढू नये.”
शेळके म्हणाले, “आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते शरद पवारांच्या अधिक जवळ जाऊ पाहताहेत. शरद पवार यांच्या जवळचे फक्त अजितदादाच असू शकतात. अन्य कोणत्याही दादांना ते जमणार नाही. रोहित पवार हे अजित पवार यांची जागा घेऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही, तर परिवार आहे. या परिवर एकसंध राहील, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेते एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण वरिष्ठ नेते एकत्र यावेत, अशी भावना रोहित पवार यांच्या वक्तव्यातून दिसत नाही. ते सातत्याने ज्यांनी पक्ष सोडला, त्यांना धडा शिकवू असे म्हणतात.
याउलट सतेत सहभागी व्हावे. नवीन सरकारमुळे विकासकामे अडली आहेत, अशी विनंती सर्व आमदारांनी अजित पवार यांना केली होती. परंतु त्यांनी शरद पवार यांना विचारून निर्णय घेऊ असे सांगितले होते. अजितदादा आमदारांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा विकास होत आहे, असेही ते म्हणाले.”
मागील कसी दिवसांपासून आमच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. दोन महिने आम्ही सगळे आरोप ऐकत आहोत. राष्ट्रवादी हा पक्ष नसून परिवार आहे. त्यामुळे सर्वांनी परिवारासारखे राहिल पाहिजे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेत शरद पवार आणि अजित पवार आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. सगळ्यांना न्याय कसा मिळेल, याचा विचार करून त्यासाठी प्रयत्न करत आहेत. – सुनील शेळके, आमदार मावळ विधानसभा…