न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२३) :- श्री गणेश उत्सवानिमित्त निगडी प्राधिकरण येथील श्री. चिंतामणी गणेश मंदिर येथे आज रविवारी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आयोजित केले होते. सकाळी आठ वाजता भक्तीताई भाटे यांनी सर्वांच्या समोर बसून अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर उपस्थित सर्वांनी अथर्वशीर्ष पठण केले.
यावेळी अथर्वशीर्ष पठणाचे २१ आवर्तने घेण्यात आले अथर्वशीर्ष पठणानंतर फलश्रुती घेण्यात आली व गणपतीची सामुदायिक आरती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त करून अल्पवोपहार आयोजित करून कार्यक्रम संपन्न झाला.
अथर्वशीर्ष पठण सामुदायिक कार्यक्रमाचे यंदा दहावे वर्ष असून कार्यक्रमास निगडी प्राधिकरण व परिसरातील महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती अर्चना वर्टीकर अध्यक्ष प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघ. विश्वास करंदीकर प्रमुख गुढीपाडवा उत्सव समिती, शशांक शहाणे अध्यक्ष श्री चिंतामणी ट्रस्ट, सुभाष जोशी. चांदबी सय्यद माजी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ. चंद्रशेखर जोशी सर्व समिती प्रमुख प्राधिकरण, किशोर दीक्षित सचिव श्री चिंतामणी मंदिर ट्रस्ट, ओंकार पाटोळे उपाध्यक्ष मविनसे पिं-चिं, भागवत नागपुरे, नारायण पठारे, नंदिनी वीरकर, प्राजक्ता पाटोळे, पुनम सकपाळ तसेच परिसरातील सर्व गणेश भक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मनसे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष बाळा दानवले, महिला प्राधिकरण विचार मंच, निगडीच्या अध्यक्षा स्वाती दानवले, प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघ, श्री चिंतामणी मंदिर ट्रस्ट प्राधिकरण निगडी, प्राधिकरण विचार मंच, निगडी यांनी केले होते.















