- शहर तसेच विधानसभा स्तरावरील ५० महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरातील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशी निष्ठा असणाऱ्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करत असलेल्या महिलांचा “पद नियुक्ती” सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस काळेवाडी येथील पक्ष कार्यालय येथे पार पडला. शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची पहिली कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी शहर तसेच विधानसभा स्तरावरील ५० महिला पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदांवर पदनियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या धोरणामुळे राज्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मिळाले. आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच ८० टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणावर काम केलं असून. आदरणीय पवार साहेबांवर निष्ठा असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची आज विविध पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढेही शहरात शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वात संघटना बळकट केली जाईल. तसेच नागरी प्रश्नावर महिला काँग्रेसच्या माध्यमातून आता सत्ताधाऱ्यांना रोख ठोक प्रत्युत्तर देण्यात येईल.
यावेळी बोलताना महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर म्हणाल्या, आदरणीय पवार साहेब, संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार विद्याताई चव्हाण, महिला प्रांताध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष असल्याचे दाखवून दिले आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने वाढती महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, आरोग्य विषयी समस्या, शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित अडचणी यासारख्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांवर जोरदार आघात करण्यात येईल”.
याप्रसंगी युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख,ओबीसी सेल अध्यक्ष विशालभाऊ जाधव, विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शहर कार्याध्यक्षपदी शारदाताई काटे चोकशी, चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी स्वप्नाली आसोले, तर कार्याध्यक्षपदी सुवर्णा वाळके, भोसरी विधानसभा अध्यक्षपदी पूजा आल्हाट,तर कार्याध्यक्षपदी सारिका हरगुडे यांची निवड करण्यात आली.यावेळी रेखा मोरे,सुप्रिया कवडे,सुजाता पाटील,पंचशीला आगळे, उज्वला सस्ते, रोहिणी जाधव सुनंदा वाघ,हलिफा शेख,स्वाती जाधव,यास्मिन शेख, प्राची ससाणे यासोबतच शहर कार्यकारणी विधानसभा कार्यकारणी आणि प्रभाग कार्यकारणी यावर पदावर इतर महिलांची देखील नियुक्ती करण्यात आली.















