- पिंपरी चिंचवड पोलीसांकडून संघटीत गुन्हेगार रडारवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२३) :- गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीसांनी संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी चंदनशिवे टोळी, गडकर टोळी, गायकवाड टोळी या तीन टोळ्यांवर “मोका अंतर्गत कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२३ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ३४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण २७२ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
दरम्यान चिखली पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२८ / २०२३ भादवि. ३०७, ३३७, ४२७, ३४, आर्म अॅक्ट ४ (२५), महा.पो. का. कलम ३७ (१), क्रि. लॉ. ॲमे. अॅक्ट कलम ३ व ७ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी १) चंदु उर्फ ओंकार शहाजी चंदनशिवे (टोळी प्रमुख) वय २० वर्षे, रा. शिवपार्वती ही. सोसा. सहयोगनगर, तळवडे पुणे, २) रामेश्वर धनराज कांबळे वय १९ वर्षे, रा. राहुलनगर, पवळे शाळेजवळ, ओटास्किम निगडी, पुणे ३) आदित्य गोरख दनुगहु वय १८ वर्षे, रा. जिवलग हौ. सोसा. ओटास्किम, निगडी पुणे ४) गणेश परमेश्वर उबाळे, वय – १८ वर्षे, रा. राहुलनगर निगडी, पुणे ५) विशाल शंकर वैरागे, वय १९ वर्षे, रा. ओटास्किम निगडी, पुणे ६) शुभम उर्फ विलन गजानन खवडे वय १८ वर्षे, रा. घरजाई मंदिराजवळ, रुपीनगर पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टाळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०८ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
दिघी पोलीस ठाणे गुन्हा. रजि. नं. ३८४/२०२३ भादंवि ३९५, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रि. लॉ. अॅमे. अॅक्ट कलम ७, महा.पो. का. कलम ३७ (१) (३) सह १३५, या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे १) ऋषीकेश हनुमंत गडकर, (टोळी प्रमुख) वय २५ वर्षे, रा. काळे कॉलनी नं.०३ आळंदी देवाची, पुणे २) भरत अण्णाराव मुळे, वय २१ वर्षे, रा. केळगाव रोड, रघुनाथ महाराज मंदीराशेजारी, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे ३) ओमकार नारायण गाडेकर, वय २० वर्षे, रा. ज्ञानराज कॉलनी, हाळदे टेलर्सच्या समोर, काळे कॉलनी नं. ०३ आळंदी देवाची, पुणे ४) अर्जुन बाजीराव वाघमोडे, वय २० वर्षे, रा. राठी सार्वजनिक वाचनालयाचे जवळ, बो-हाडेवाडी, मोशी पुणे ५) विधी संघर्षीत बालक ६) तीन अनोळखी इसम यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १७ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
शिरगांव परंदवाडी पोलीस ठाणे गुन्हा. रजि. नं. ९६ / २०२३ भादंवि ३०२,१२० ब. २१२, १०९, २०१ ३४. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५, क्रि. लॉ. अॅ. अॅ. कलम ७ व शस्त्र अधि. कलम ४ (२७) या ” गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी (१) विशाल उर्फ किरण सुनिल गायकवाड, (टोळी प्रमुख) वय २५ वर्षे, रा. शिरगाव, जि.प. शाळेसमोर ता. मावळ (२) संदिप उर्फ अण्णा छगन गोपाळे, वय ३१ वर्षे, रा. शिरगाव, मारूती मंदिराजवळ ता. मावळ (३) ऋत्वीक शिवाजी गोपाळे, वय २२ वर्षे, रा. सोमाटणे फाटा, डॅफोडिल्स पी ३१, ता. मावळ (४) अक्षय बबन ओहोळ, वय २६ वर्षे, रा. केम ता. करमाळा, जि. सोलापर. (५) अमोल आप्पासाहेब गोपाळे, वय ३८ वर्षे, रा. डॅफोडील सोसायटी, बंगला नं. पी / ३१ सोमाटणे फाटा ता. मावळ (६) निखील दिलीप बालवडकर, वय ३२ वर्षे, रा. सुप्रिया संकुल, ए विंग, फ्लॅट नं. ०६, बाणेर पुणे (७) सागर राहुल ओहोळ, वय २५ वर्षे, बालेवाडी गावठाण, हिंदुस्तान बेकरीजवळ, पुणे, मुळगाव, रा. केम ता. करमाळा, जि. सोलापूर (८) संतोष ऊर्फ अमर प्रकाश ओझरकर रा. मान, पो.हिंजवडी, मा. मुळशी जि. पुणे. यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०५ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
वरील तीनही टोळी प्रमुख यांनी त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाकदपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी चिखली, निगडी, तळेगाव, दिघी, आळंदी, भोसरी एमआयडीसी, येरवडा, शिरगाव-परंदवडी, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत घातक शस्त्रे जवळ बाळगुन त्याद्वारे दहशत निर्माण करुन खुन, खुनाचा प्रयत्न, मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, दरोड्याची तयारी, खंडणी, जबरी चोरी, दुखापत, वाहनांची चोरी करणे, चोरी, घरफोडी चोरी, जनतेचे जिवीत व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणे, बेकायदेशीर रित्या हत्यारजवळ बाळगणे खुनाचा कट रचणे, खुन केल्याचा पुरावा नष्ट करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दुखापत करणे, सरकारी नोकरास शासकीय कर्तव्य करणेपासुन अटकाव करुन मारहाण करणे, अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमानसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखांनी गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला होता. प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (परि-०३) संदिप डोईफोड, पोलीस उप-आयुक्त (परि-०२) काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे मॅडम, सपोआ बाळासाहेब कोपनर ( गुन्हे – ०१), सपोआ राजेंद्र सिंह गौर (भोसरी एमआयडीसी विभाग), सपोआ पद्माकर घनवट ( देहुरोड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि पी. सी. बी ( गुन्हे शाखा), वपोनि श्री. ज्ञानेश्वर काटकर (चिखली पो.स्टे) वपोनि मच्छिंद्र पंडित (दिघी पो.स्टे), वपोनि श्रीमती. वनिता धुमाळ मॅडम (शिरगाव परंदवाडी पो.स्टे) पोउपनि सुनिल भदाने (दिघी पो.स्टे) तसेच अंमलदार पो.हवा सचिन चव्हाण, पो. हवा. व्यंकप्पा कारभारी, पी. सी. बी. गुन्हे शाखा, पोहवा शरद विंचु, पोहवा शशिकांत पवार ( दिघी पो.स्टे) सपोफी दत्तात्रय कदम, मोना दुर्गा केदार (चिखली पो.स्टे), पोहवा तुकाराम साबळे, पोना योगेश नागरगोजे (शिरगाव पो.स्टे यांच्या पथकाने केली आहे.













