न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२३) :- हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान (दि. २५) रोजी सकाळी ११.३० ते १२.०० वाजता उमेदवारी अर्जाच्या छाणणीच्या वेळी आरोपी यांनी गणेश बन्सीलाल जांभुळकर यांच्या अर्जावर हरकत घ्यायचे असल्याचे कारण सांगितले.
त्यांचा उमेदवारी अर्ज फिर्यादीकडुन हिसकावुन आरोपीने ताब्यात घेतला. तो फाडुन टाकला. तो फाडलेला अर्ज स्वतःच्या ताब्यात ठेवुन घेवुन सरकारी कामात अडथळा व अटकाव केला.
याप्रकरणी फिर्यादी हेमंत लक्ष्मण नाईकवाडी यांनी आरोपी मयुर राजेंद्र साखरे (रा. हिंजवडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध ११०२/२०२३ भा.दं.वि कलम ३५३,१८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि देशमुख पुढील तपास करीत आहेत.













