न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२३) :- हॉटेल व्यवसायिक विजय ढुमे यांचा पुण्यात सिंहगड रस्त्यावर धारदार हत्याराने आणि कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची माहिती मिळतेय.
हा प्रकार सिंहगड रस्त्यावरील क्वॉलिटी लॉजजवळ आज शुक्रवारी (दि. २९) रोजी सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान घडला असल्याचे समजते. क्वॉलिटी लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असतानाच चार ते पाच हल्लेखोरांनी ढुमे यांच्यावर अचानक हल्ला केला.
सिंहगड रोड पोलिस स्टेशन याबाबत तपास करीत आहेत. तसेच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळतेय.