- मतदार नोंदणीचा आहे उद्या अखेरचा दिवस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२३) :- लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणूक लांबणीवर पडली असली तरी मतदार नोंदणीचे काम सुरू आहे. वयाचे १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणीची अखेरची संधी असून तीस सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. त्यांचीच नावे जानेवारीच्या यादीत समाविष्ट होणार आहेत.
वयाचे अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार यादीत नाव येण्यासाठी नोंदणीची अखेरची संधी आहे. जानेवारी २०२४ मध्ये या मतदारांची नावे यादीमध्ये येतील. येणाऱ्या चार महिन्यांत जे १८ वर्षांचे होतील, त्यांनाही अर्ज करता येणे शक्य आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारसंघनिहाय नोंदणी कार्यालय आहेत. तसेच ऑनलाइन नोंदणीचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. व्होटर हेल्पलाइन, इलेक्शन अॅप्सचा वापर करून नोंदणी करता येते. मतदार नोंदणी झाल्यानंतर कार्ड पोस्टाने पत्त्यावर येते. जर आले नाहीतर मतदारसंघनिहाय कार्यालयात विचारणा करून कार्ड स्टेट्सची विचारणा करता येते. अर्ज भरण्याच्या गडबडीत मतदार यादीतील नावात चूक देखील होऊ शकते. त्यामुळे मतदारांनी काळजीपूर्वक अर्ज करणे गरजेचे आहे. नवमतदारांना नोंदणी करता येणार आहे. इतर मतदारांसाठी नियमित नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.















