न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२३) :- सहकार मंत्री अमित शहा सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे भविष्यात अडचणी सोडविण्यासाठी सहकारी बँकांना फायदा होणार आहे, असे प्रतिपादन भाजपा लीगल सेलचे अध्यक्ष, धर्मवीर संभाजी बँकेचे संचालक व अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांनी व्यक्त केले.
एका वर्तमानपत्राच्या कार्यालयात आरती आणि दर्शनासाठी आले असता ते बोलत होते. या वेळी अॅड. गोरखनाथ झोळ म्हणाले की, नेहरूनगर येथे पिंपरी कोर्टाचे स्थलांतर झाले. तेथील कामकाज व्यवस्थित सुरू आहे. तेथील सेशन कोर्ट सुरू होणे अपेक्षित आहे. तसेच मोशी येथे कोर्टाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यासाठी तत्कालीन आमदार कै. लक्ष्मण जगताप तसेच आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कोर्टाचे बांधकाम सुरू होत आहे. तसेच माजी व विद्यामान अध्यक्षांसह सर्वांनी प्रयत्न केले आहे.
अॅड. गोरखनाथ झोळ म्हणाले की, सध्या सहकार क्षेत्रात आरबीआयचे लक्ष आहे. सहकार मंत्री अमित शहा सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे बँकांना फायदा होईल. तुकडेबंदी कायद्याबाबत आयजीआरने काढलेल्या परिपत्रकावर मुंबई उच्च न्यायालयात मी स्वतः याचिका दाखल केली आहे. तसेच औरंगाबाद व नागपूर खंडपीठमध्ये याचिका दाखल केल्या होत्या. परंतु औरंगाबाद खंडपीठाचा निकाल ताबडतोब झाला. त्यामध्ये आयजीआरने काढलेले परिपत्रक खंडपीठाने रदबादल ठरवले. त्यानंतर राज्य शासनामार्फत औरंगाबाद खंडपीठात रिविजन दाखल करण्यात आली. त्याचा निकाल आमच्या बाजुने लागला व शासनाची याचिका फेटाळली. त्यानंतर शासन सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. सर्वोच्च न्यायालायने तात्पुरती स्थगिती दिली आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजुने लागण्याची शक्यता आहे. तुकडेबंदी कायद्याबाबत आमच्या बाजूने व नागरिकांच्या बाजूने निकाल देतील अशी अपेक्षा आहे. साठे खताबाबत सरकारने जीआर काढला आहे. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन. परंतु त्या आदेशाप्रमाणे कोणतेही टायटल क्लियर होत नाही. तरी शासनाने सर्व प्रकारचे खरेदीखते, वाटणीपत्र, बक्षीसपत्र काढण्यासाठी जीआर काढावा व खरेदी खत नोंदणी चालू करावी. तरच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला.















