न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२३) :- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पवना नदी संवर्धनासाठी वाल्हेकरवाडीतील पवनेच्या जाधव घाट परिसरात निर्माल्य संकलन उपक्रम, गणपती विसर्जन हौद, गणपती दान असे विविध उपक्रम राबविण्यात आले होते.
गणेशोत्सव २०२३ मध्ये दीड, पाचवा, सातवा आणि दहाव्या दिवशी सर्व यंत्रणांशी योग्य समनव्यय साधत नागरिकांना मार्गदर्शन केले. १०० टक्के निर्माल्य संकलन केले. नागरिकांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत उपक्रमाचे कौतुक केले. निर्माल्य वेगळे केल्यानंतर तेथील सेल्फी पॉईंटवर फोटोही काढले. मोठ्या मंडळाचे गणपती वगळता १०० टक्के घरगुती मूर्ती हौदात विसर्जित अथवा दान करण्यास नागरिकांनी सहकार्य केले.
पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीम, पालिका आरोग्य विभागाचे प्रशासन अधिकारी अमित पंडित, आरोग्य मुख्याधिकारी महादेव शिंदे, शंकर घाटे आणि रोटरी वाल्हेकरवाडीसह निर्माल्य संकलन आणि त्याची वाहतूक व्यवस्था तसेच घाटाची स्वछता सातत्याने करण्यास अथक परिश्रम घेतले. राष्ट्रीय सेवा योजनांच्या मुलांनीही प्रा. शिवाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरीच्या कार्यास हातभार लावला. रोटरीचे अध्यक्ष सुधीर मरळ यांनी आभार मानले.
रोटरी वाल्हेकरवाडीच्या या उपक्रमात रो. सुधीर मरळ, प्रदीप वाल्हेकर, तन्मय वाल्हेकर, निलेश सोनवणे, संदीप भालके, गणेश बोरा, रुपेश मुनोत, महेश जगताप, रेश्मा बोरा, वसंत ढवळे, रामेश्वर पवार, ज्योती भालके, गोविंद जगदाळे सर, सुभाष वाल्हेकर, अभिषेक वाल्हेकर, अतुल क्षीरसागर यांनी सहभाग नोंदवला.












