न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२३) :- अवैध रित्या गॅसची चोरी करुन स्फोटास, मानवी जीवीतास व मालमत्तेस नुकसान करण्यास कारणीभूत असलेल्या तीन आरोपींना वाकड पोलीसांनी घेतले ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे.एस.पी.एम. कॉलेज परिसर, ताथवडे, येथे रविवारी (दि. ८) रोजी रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरून वाकड पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन महसुल खात्याकडील अधिकारी. व एम. एन. जी. एल. फायर ब्रिगेड यांना कळवून योग्य ती उपाययोजना केली.
त्यामध्ये तपास केला असता सदर ठिकाणी आग ही गॅसचे टँकर गाड़ी क्र GJ 16 AW 9045 मधुन नोजल पाईप द्वारे गॅस चोरुन व्यावसाईक गैस टाक्या भरण्याचे चालु असताना गॅस लिकिज झाल्याने स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निष्पन्न झाले. सदर आगीमध्ये जेएसपीएम कॉलेज आवारात पार्क केलेल्या ब्लॉसम स्कुलचे तीन स्कुल बस, गॅसचा टैंकर, गॅस चोरुन नेण्यासाठी सिलींडर असलेला टेम्पो इत्यादी जळुन नुकसान झाल्याने आरोपी यांनी संगणमत करून प्रोपीलीन गॅस या जिवनावश्यक वस्तुची बेकायदेशीरपणे व स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता चोरी करुन त्याची काळ्या बाजारात वाढीव दरात विक्री करण्यासाठी व्यावसाईक गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरताना केलेल्या कृती मुळे मोठ्या प्रमाणात आग लागुन स्फोट होऊन मानवी जिवितास धोका निर्माण केला तसेच मालमत्तेची हानी केली.
तसेच सदरचे काम गैर कायदेशिर असल्याची माहित असतांना सुध्दा पैश्याचे मोबदल्यात जागा मालक नामे चंद्रकांत महादेव सपकाळ याने आपली जागा उपलब्ध करुन दिली म्हणुन सर्व आरोपीविरुध्द वाकड पोलीस स्टेशनचे पोउनि भारत माने यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने वाकड पो स्टे गुरन, ९८०/२०२३ भा.द.वि. कलम ३७९,४०७, २८५,३३६,४२७.३४ व जिवनावश्यक वस्तु अधिनीयम कलम ३.७ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३.४ प्रमाणे कायदेशिर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदर गुन्हयातील आरोपी यांना वाकड पोलीसांनी तात्काळ निष्पन्न करुन आरोपी १) महिपाल चौधरी, रा. साई पॅराडाईज सोसा. पुनावळे २) राहुलकुमार राज देवराम, रा. बेलठीका नगर, थेरगाव, पुणे, ३) चंद्रकांत महादेव सपकाळ रा. जे. एस. पी. एम कॉलेज जवळ ताथवडे पुणे. यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेविरुध्द अटक कारवाई चालु आहे. तसेच एक आरोपी फरार असुन त्याचा शोध चालु आहे. गुन्हयाचा सखोल तपास करुन आणखी इतर कोणाचा सहभाग निष्पन्न होत असल्यास त्यांना अटक करून त्याप्रमाणे पुढील कायदेशिर कारवाई करीत आहेत.















