न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२३) :- खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात रविवारी (दि. ८) रोजी येवले चहासमोर भर रस्त्यात सिमेंट मिक्सर टँकरने अचानक पेट घेतला.
चालकाला नागरिकांनी आवाज देऊन गाडी थांबवण्यास सांगितले. चालकाने गाडी थांबवली. वेळीच नागरिकांनी आजूबाजूच्या हॉटेल आणि चहाच्या दुकानातून पाणी आणून आग आटोक्यात आणली. मोठा अनर्थ टळला. रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती.











