न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२३) :- संत निरंकारी मिशनच्या वतीने खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २२६ निरंकारी भक्तांनी रक्तदान केलं. वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी यांनी १६८ युनिट तर औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी ५८ युनिट रक्त संकलन केले.
या शिबिराचे उदघाटन अंगद जाधव, अतुल देशमुख (भा.ज.पा. जिल्हा अध्यक्ष), चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. गेल्या १५ दिवसांपासून मिशनच्या सेवादारांनी राजगुरूनगर परिसरामध्ये रक्तदानाची जनजागृती करण्यात आली.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक नरेंद्र रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार राजगुरूनगर ब्रांच प्रमुख बाळासाहेब जाधव यांनी मानले.













